हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाला २४ तास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या महामार्गावर पहिला अपघात झाला. वायफळ टोल नाक्यावर एका कारने पुढच्या कारला जोरदार धडक दिली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर ब्रिजखाली ट्रक अडकल्याने बराच गोंधळ निर्माण झाला होता.
( हेही वाचा : नववर्षात रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळणार खास सुविधा! या स्थानकांवर सुरू होणार ‘ममता कक्ष’)
ट्रक अडकला
शिर्डी इंटरचेंज मार्गावर ब्रिजखाली ट्रक अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. समृद्धी महामार्गाच्या ब्रिजची उंची कमी आहे त्यामुळे चेन्नईहून ऑईल रिफायनरीचे मशीन घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असलेला ट्रक ट्रेलर ब्रिजखाली अडकला. रस्त्यापासून पुलाची उंची कमी असल्याने मोठ्या मशिनी वाहतूक करणारी वाहने ब्रिजखाली अडकत आहेत. यामुळे वाहनधारकांचे सुद्धा हाल होत आहेत.
पहिल्या अपघाताची नोंद
दरम्यान, समृद्धी महामार्गावर सोमवारी दुपारी पहिल्या अपघाताची नोंद झाली. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसून यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
समृद्धी महामार्गावर एसटी बस धावणार
आता १५ डिसेंबरपासून नागपूर-शिर्डी महामार्गावर लालपरी धावणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथून रात्री ९ वाजता बस शिर्डीसाठी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी शिर्डी येथून रात्री ९ वाजता बस सुटेल ही एसटी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नागपुरात दाखल होईल.
Join Our WhatsApp Community