भारत आणि चीन संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत; S. Jaishankar यांचे विधान

49

भारत आणि चीन (india china relations) पुन्हा एकदा संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर (S. Jaishankar) यांनी केले. ते ‘एशिया सोसायटी’च्या (Asia Society) संवादात्मक सत्रात बोलत होते.

(हेही वाचा – BMC : नाल्यांमधील कचरा रोखण्यासाठी फायबरच्या जाळ्या बसवण्याचा पर्याय; अतिरिक्त आयुक्तांचे ३१ मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश)

या वेळी डॉ. जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की, तणावपूर्ण नातेसंबंध कुणासाठीही लाभदायक नसतात. वर्ष २०२० मध्ये गलवान खोर्‍यात जे घडले तो समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हता. गलवानमध्ये जे घडले, ते खरोखरच वेदनादायक होते. तो केवळ संघर्ष नव्हता, तर लेखी करारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. असे नाही की, हे सूत्र पूर्णपणे संपले आहे, आम्ही अजूनही घटनेशी संबंधित काही भाग हाताळत आहोत. आपण अनेक मुद्द्यांवर स्पर्धा करतो; परंतु आपण यासाठी लढू नये. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध कोणत्याही पक्षाच्या हिताचे नाहीत; कारण जर सीमेजवळ शांतता भंग झाली, तर उर्वरित संबंधही योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.