मागच्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर रोगांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. तसेच, इतर रोगाच्या रुग्णांचे प्रमाणही घटले. पण आता मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, इतर रोगांच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोना आणि टी.बी. म्हणजेच क्षयरोगाची लक्षण सारखी असल्याने, आता क्षयरोगांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. 2021 मध्ये जवळजवळ क्षयरोगाच्या 2 लाख 623 रुग्णांची नोंद करण्यात आली.
अचानक वाढली रुग्णसंख्या
राज्यात 2019 मध्ये 2 लाख 27 हजार 4 क्षयरुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये यात कमालीची घट झाली. राज्यात 2020 मध्ये 1 लाख 60 हजार 72 क्षयरुग्णांची नोंद झाली. त्यानंतर 2021 मध्ये राज्यात 2 लाख 623 क्षयरुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्णसंख्या घटण्याचे कारण
कोरोना काळात या क्षयरोगांचे निदान करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे क्षयरोग रुग्णांची संख्या 41 टक्क्यांनी कमी झाली. राज्यात 2019 मध्ये सुमारे 2 लाख 17 हजार क्षयरोगाचे रुग्ण नव्याने आढळले. पण, हेच प्रमाण कोरोना साथीमध्ये 1 लाख 60 हजारांपर्यंत घसरले. 2021 च्या दुस-या कोरोना लाटेमध्येही क्षयरोग रुग्णांचे प्रमाण 41 टक्क्यांनी घटले होते.
( हेही वाचा: सरकारच्या निर्णयानंतरही मुंबईतील मराठी पाट्या ‘लटकल्या’! )
…म्हणून झाली होती निदानात घट
- क्षयरोग रुग्णांमध्ये झालेली ही वाढ चिंता वाढवणारी आहे.
- कोरोनाच्या चाचण्यांसाठी सीबीएनएएटी या निदान तंत्राचा वापर
- कोरोनाच्या कामासाठी मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर
- सामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणा-या लक्षणाबद्दल भीती.
- खासगी रुग्णालये, दवाखाने टाळेबंदीमुळे बंद