PM Narendra Modi : तीन महिन्यांपासून औषधांसाठी क्षयरोगींचे पंतप्रधानांना पत्र

राज्यातील सरकारी रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून क्षयरोगावरील औषधेच उपलब्ध झालेली नाहीत.

144
PM Narendra Modi : तीन महिन्यांपासून औषधांसाठी क्षयरोगींचे पंतप्रधानांना पत्र
PM Narendra Modi : तीन महिन्यांपासून औषधांसाठी क्षयरोगींचे पंतप्रधानांना पत्र

भारत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा पंतप्रधान (Prime Minister )नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून क्षयरुग्णांना औषधेच मिळालेली नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यामध्ये एमडीआर क्षयरोग रुग्णांना जूनपासून औषधेच मिळालेली नाहीत. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधेचे उपलब्ध नसतील, तर देश क्षयरोगमुक्त (TB) कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करणारी पत्रे रुग्णांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पाठविली आहेत.
राज्यातील सरकारी रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून क्षयरोगावरील औषधेच उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई विभागातील जवळपास ११ हजार एमडीआर क्षयरोग रुग्णांना याचा फटका बसत आहे. आरोग्य केंद्रांवर औषधे मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. एमडीआर क्षयरोग असलेल्या रुग्णांना पाच औषधे दिली जातात. त्यापैकी सायक्लोसिरिन लाईनजोलिड, क्लोफाजिमाईन या औषधांचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे ही औषधे रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं.)

ही औषधे कधी मिळतील याबाबत मुंबई क्षयरोग नियंत्रण विभागाकडे विचारणा करण्यात आल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. औषधांअभावी क्षयरोग रुग्णांना होणाऱ्या या त्रासाची माहिती देण्यासाठी क्षयरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र पाठविली आहेत. औषधे का उपलब्ध होत नाहीत, असी विचारणाही या पत्रात करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.