TuljaBhavani Temple : … म्हणून 1 जानेवारीपर्यंत तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार दर्शनासाठी खुले

151
Tulja Bhavani Temple च्या जिर्णोद्धारासाठी पंधरा दिवसांत बैठक

नाताळच्या सुट्या (Christmas holidays), नवीन वर्ष (New Year) तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तुळजाईनगरीत (TuljaBhavani Temple) भाविकांची गर्दी होत आहे. आगामी आठ दिवस 1 जानेवारी भाविकांची गर्दी कायम राहणार असून, या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (TuljaBhavani Temple)

हेही वाचा-Pakistan Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; १५ जण ठार

1 जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी आदेश काढले आहेत. यानुसार 1 जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार असून, अभिषेक पूजा सकाळी 6 वाजता होणार असल्याचे जाहीर प्रगटन मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माळी यांनी काढले आहेत. मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे पुजारी, भाविकांतून स्वागत करण्यात येत आहे. (TuljaBhavani Temple)

हेही वाचा-Ladki Bahin scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. तर रात्री 10.30 च्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. (TuljaBhavani Temple)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.