Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड

266
Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड
Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड

तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani temple) देवीच्या नित्योपचारातील दागिने गहाळ झाले आहेत, तर काही दागिन्यांच्या वजनात तफावतही झाली आहे. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. (Tuljabhavani Temple Scam)

महाराष्ट्राची (Maharashtra) कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाले आहेत. ही माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांत चर्चा चालू आहे.

(हेही वाचा – Illegal Vehicle Parking : अवैध वाहन पार्किंगला आळा; महापालिका मार्शल्सना उतरवणार रस्त्यावर)

काय आहे देवाच्या दारातील पाप
  • 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गहाळ
  • 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गहाळ
  • सोन्याच्या मुकुटाच्या जागी ठेवला बनावट मुकुट
  • 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र गहाळ
  • नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाले आहेत.
  • 4 तोळ्याच्या सोन्याच्या पादुकांच्या जागी तांब्याच्या पादुका
  • अर्पणात आलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेतही सोन्यात 50 टक्के तूट

यापूर्वी देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्यांची मोजणी करण्यात आली होती. (Tuljabhavani Temple Jewellery Scam) याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. मात्र या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला आहे.

कारवाई करण्यासाठी समिती स्थापन

देवीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ३-४ दिवसांत अहवाल देणार आहे.

यापूर्वीही झाला होता घोटाळा

यापूर्वीही तुळजाभवानी (Tuljapur) मंदिराचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत श्री भवानीदेवीचे अतीप्राचीन अलंकार, वस्तू, तसेच भाविकांनी अर्पण केलेले ३४८.६६१ ग्रॅम सोने आणि ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू अन् ७१ प्राचीन नाणी यांची चोरी केली होती. तसेच श्री तुळजाभवानी मंदिरात १९९१ ते २००९ या काळात ८ कोटी ४५ लाख १७ सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा झाल्याच्या प्रकरणीही राज्‍य गुन्‍हे अन्‍वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. (Tuljabhavani Temple Scam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.