तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील अलंकार गहाळ झाल्याची घटना ताजी असतांनाच आणखी एक दागिना गहाळ झाला आहे. (Tuljabhavani Temple Scam) ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. (government Temple)
तक्रारीत म्हटले आहे की, एक ते सात डब्यांत असलेल्या पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान असलेल्या अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गहाळ झाले आहेत. हा चांदीचा मुकुट २०११ सालापूर्वी मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता. (Hindu Temples)
(हेही वाचा – Maratha Reservation : सरसकट मराठा आरक्षण देणे अशक्य; २४ डिसेंबरच्या डेडलाईनचा हट्ट सोडा; गिरीश महाजनांचे जरांगे पाटलांना आवाहन)
७ जणांवर गुन्हा दाखल
तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) मंदिरातील एक ते सात डब्यांत पुरातन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार आहेत. त्यांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले आहेत. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मयत असून महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. सध्या ते फरार झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवर पुढील कारवाई चालू आहे. (Tuljabhavani Temple Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community