तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, आज, बुधवारी ११ ऑक्टोबरपासून तुळजापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
दर्शन मंडप घाटशिळ येथे नको, अशी भूमिका पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला आहे. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यात दर्शन मंडप हा घाटशीळ येथे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शन मंडप तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे. दर्शन मंडपाची जागा बदलल्यास व्यापारी यासह स्थानिक नागरिकांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष )
Join Our WhatsApp Community