सोलापूर-तुळजापूर महामार्ग (Tuljapur-Solapur Highway Closed) आजपासून (२७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत) तीन दिवस बंद राहणार आहे. येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अंतिम टप्प्यातील तयारीनिमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.
नवरात्रोत्सव काळात सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी असते. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज बुधवार, २७ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत तुळजापूर-सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
(हेही वाचा – BJP : दोन दिवसांत भाजप राजस्थान विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी करणार जाहीर )
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विभागनिहाय यंत्रणेकडून शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. तुळजापुरातील शारदीय नवरात्रोत्सव ६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या दिवसांत देशभरातून भाविक श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येतात. या यात्रेसाठी सोलापूरहून भाविक पायी चालत मंदिरात येतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन आणि तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community