Tunnel Between Vasai To Thane: आता वसई ते ठाणे प्रवास होणार सूकर! जाणून घ्या काय आहे हा प्रकल्प?

2532
Tunnel Between Vasai To Thane: आता वसई ते ठाणे प्रवास होणार सूकर! जाणून घ्या काय आहे हा प्रकल्प?
Tunnel Between Vasai To Thane: आता वसई ते ठाणे प्रवास होणार सूकर! जाणून घ्या काय आहे हा प्रकल्प?

ठाणे ते बोरिवली प्रवास सूकर करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ठाणे, बोरिवलीदरम्यान ११.८ किमीचा दुहेरी बोगदा (Tunnel Between Vasai To Thane) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यातच आता ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड आणि भाईंदरला जाणे सोपे व्हावे यासाठी फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख, घोडबंदर, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गायमुख ते वसई बोगद्याने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल, वसई ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातील वाहतूक कोंडीदेखील कमी होणार

घोडबंदर येथे वाहतूक कोंडीमुळं ठाणेकर हैराण झाले आहेत. तासनतास या ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. पण घोडबंदर ते वसई वा घोडबंदर ते भाईंदर असा रस्ता बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे खाडी आणि डोंगराळ भाग असल्याने रस्ता बांधणे अशक्य आहे. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल नाका असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मार्ग, उन्नत रस्त्याच्या २० हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं ठाण्यातील वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे. (Tunnel Between Vasai To Thane)

कसा असेल रस्ता? (Tunnel Between Vasai To Thane)

फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख बोगदा ५.५ किमीच असेल तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत रस्ता १० किमीचा असणार आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी अंदा २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा चार मार्गिकेचा असणार असून उन्नत रस्ता 6 मार्गिकेचा असणार आहे. (Tunnel Between Vasai To Thane)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.