Turdal Expensive: तूरडाळीला अवकाळी पावसाचा फटका, दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार; वाचा नवीन दरवाढ

साखर, धान्य, तांदूळ, खाद्यतेलापाठोपाठ आता तूरडाळ, कडधान्य, मूग आणि उडीद डाळीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

146
Turdal Expensive: तूरडाळीला अवकाळी पावसाचा फटका, दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार; वाचा नवीन दरवाढ

सलग दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव सतत वाढत असून ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खाद्यतेलासह डाळीचे भाव कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला ब्रेक लागला आहे. कारण पाम तेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. तसेच तूर डाळीचे उत्पादन पावसामुळे कमी झाल्याने दरात सतत वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूर डाळ ४० टक्के वाढलेली आहे. (Turdal Expensive)

साखर, धान्य, तांदूळ, खाद्यतेलापाठोपाठ आता तूरडाळ, कडधान्य, मूग आणि उडीद डाळीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वरणभात, कडधान्यांची उसळ करताना गृहिणींना विचार करावा लागणार आहे. ठोक बाजारात सध्या तूरडाळ १६५ रुपये किलो (Turdal Expensive) तर किरकोळ बाजारात १८० ते १८५ रुपये किलो आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत तूर डाळ २१० ते २२० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे ‘किचन बजेट’ मात्र कोलमडून जाणार आहे.

(हेही वाचा – Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग)

मूगडाळीचे दरही वधारले…
तूरडाळी पाठोपाठ मूगडाळीचे दरही वधारले आहेत. मुगाची डाळ ठोक बाजारात १०८ ते १२२ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना १४० ते १४५ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच उडीद मोगरचे भावही वाढले असून प्रतिकिलो ठोक बाजारात १३०ते १३६ रुपये भाव असून किरकोळ बाजारात १५० रुपयांवर गेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.