तुर्कस्तान पुन्हा हादरले…२९ इमारती कोसळल्या

तुर्कस्तानमध्ये २२ दिवसांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपाच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या की पुन्हा भूकंपाने लोकांना हादरवायला सुरुवात केली आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथे पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने २९ इमारती कोसळल्या. भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला, तर ६९ हुन अधिक लोक जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी नोंदवण्यात आली.

आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारीला तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. पहाटे ४.१७ वाजता पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.८ तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता. लोक त्यातून सावरण्याआधी, थोड्या वेळाने दुसरा भूकंप झाला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.४ तीव्रता होती. भूकंपाच्या धक्क्यांचा हा काळ इथेच थांबला नाही. यानंतर ६.५ रिश्टर स्केलचा आणखी एक धक्का बसला. या भूकंपांनी मालत्या, सानलिउर्फा, उस्मानीये आणि दियारबाकीरसह ११ प्रांतांमध्ये हाहाकार माजवला. सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचा आणखी एक धक्का बसला. या धक्क्याने सर्वाधिक विध्वंस झाला. बरोब्बर दीड तासानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भूकंपाचे पाचवे धक्के जाणवले. तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या ३३ हजाराच्या पुढे गेली आहे. तुर्कस्तानच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे अनेकदा भूकंप होतात.

(हेही वाचा आसाममध्ये हिंदूंच्या घरवापसीला वेग; ११ कुटुंबातील ४३ जणांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here