सोमवार, ६ फेब्रुवारी रोजीची सकाळ तुर्की, सीरिया आणि लेबेनॉन या तीन देशांसाठी काळ म्हणून आली. अचानक या तीनही देशांमध्ये ७.८ रिस्टर इतक्या क्षमतेचा भूकंप झाला. त्यात ५०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या भूकंपाबाबत तीन दिवसांपूर्वीच पूर्वसंकेत मिळाले होते. कारण तसे संकेत देणारे ट्विट ३ फेब्रुवारी रोजी व्हायरल झाले होते, आता तेच ट्विट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या भूकंपातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तुर्कीमध्ये मोठी जीवित आणि वित्त हानी घडवून आणणाऱ्या भूकंपाबाबत तीन दिवस आधीच एका संशोधकाने इशारा दिला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या संशोधकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात इशारा दिला होता. आता हे ट्वीट व्हायरल होत असून त्यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच, भूगर्भ शास्त्रज्ञ किंवा भूगर्भशास्त्र विभागाकडून देण्यात येत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे गंभीर ठरू शकते, अशी प्रतिक्रियाही यासंदर्भात व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा 7.9 रिश्टर स्केलच्या भुकंपानं हादरलं तुर्की; 34 इमारती पडल्या, मोठी जीवितहानी झाल्याची भीती)
कोणते होते ते ट्विट?
Frank Hoogerbeets यांचे हे ट्विट असून ssgeos या संस्थेमध्ये ते संशोधक म्हणून काम करत आहेत. ३ फेब्रुवारी रोजीच या भूकंपाच्या धक्क्याविषयी त्यांनी कल्पना दिली होती. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या भूकंपाच्या तीव्रतेचा आकडाही जवळपास तंतोतंत खरा ठरल्यामुळे या ट्वीटची चर्चा होऊ लागली आहे. “नजीकच्या काळात दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सिरिया, लेबेनॉन या भागात ७.५ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे”, असे या ट्वीटमध्ये फ्रँक हूगरबीट्स यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटसोबत भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता.
Join Our WhatsApp CommunitySooner or later there will be a ~M 7.5 #earthquake in this region (South-Central Turkey, Jordan, Syria, Lebanon). #deprem pic.twitter.com/6CcSnjJmCV
— Frank Hoogerbeets (@hogrbe) February 3, 2023