तुर्कीत २४ तासांत ३९ भूकंपाचे धक्के

124

तुर्कीसाठी सोमवार, ६ फेब्रुवारी हा संपूर्ण दिवस काळ ठरला आहे. सकाळी ६ वाजल्यापासून येथे जोरदार भूकंपाचे धक्के सुरु आहेत, ते दिवसभर सुरूच आहेत. तब्बल ३९  भूकंपाचे धक्के या देशाला सहन करावे लागले. ही इतकी मोठी आपत्ती होती की, यातून १ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला आहे, तर वित्त हानीची गणतीच झाली नाही. तुर्कीमध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी १ वाजून २४ मिनीटांनी दुसरा धक्का बसला. 

१८ किमीपर्यंत भूकंपाचे बसले धक्के 

एक मोठा भूकंप झाल्यानंतर त्यानंतर इतर काही लहान-लहान भूकंपांची मालिका सुरूच होती. तुर्कीमध्ये पहिला भूकंप ७.८ रिश्टर स्केलचा झाला, त्याची डेप्ट ही १८ किमीची होती. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. गाझियनटेप हे भूकंपस्थानापासून सीरिया हा देशही जवळ आहे. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता तुर्की आणि सीरियामध्ये जाणवली. तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झाले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. अनेक देश आपत्तीग्रस्त तुर्कीला मदत करणार आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. भूकंपाच्या दरम्यान तुर्कीच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. सध्या देशात कडाक्याची थंडी पडत आहे. भूकंपामुळे येथील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झाले आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यातही अडचण निर्माण झाली आहे.

(हेही वाचा तुर्कीतील भूकंपाबाबत ३ दिवसांपूर्वीच मिळालेले पूर्वसंकेत; ट्विट होतेय व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.