ट्वीन टॉवर प्रमाणेच चांदणी चौकातील पूलही पडणार

172

नोएडा येथील ३२ माळ्यांची बेकायदेशीर दोन इमारती काही मिनिटात जमीनदोस्त करण्यात आली. ज्या कंपनीने हे टॉवर पाडले, आता तीच कंपनी पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पडणार आहे. अवघ्या १० सेकंदात हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आणि अखेर चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जामवर रामबाण उपाय मिळाला.

कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे पूल पडणार 

Edifice engineering या कंपनीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी निवड केली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स या कंपनीने पाडले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी edifice engineering या कंपनीचे कर्मचारी गुरुवारी, १ सप्टेंबर रोजी सर्वेक्षण करण्यासाठी या पुलाची पाहणी करणार आहेत. हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे होणार आहे.

(हेही वाचा फुटीच्या भीतीने उपनेते पदाची माळ शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात)

काय आहे कंट्रोल्ड एक्स्प्लोजन? 

  • कमीतकमी वेळेत पाडकाम केले जाते
  • आजूबाजूच्या इमारती सुरक्षित राहतात
  • इमारतीचा ढिगारा दूरपर्यंत पसरत नाही
  • इमारतीमध्ये खास प्रकारची स्फोटके बसवली जातात
  • एकाचवेळी त्यांच्यात स्फोट घडवून आणला जातो
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.