‘ट्विटर’कडून एडिट बटण उपलब्ध, पण कुणासाठी… 

117

अनेकदा आपण ट्वीट केल्यानंतर काही वेळानंतर त्यात काही चुका दिसून येतात, मात्र त्यात एडिटचा पर्याय नसल्यामुळे ते ट्वीट डिलीट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आता याच अडचणीची दखल ट्विटरने घतली आहे. लवकरच ट्विटरकडून एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

ब्लू टिक असलेल्या अकाउंटसाठीच… 

ही सुविधा ट्विटर व्हेरीफाईड अकाउंट असणाऱ्यांना मिळणार आहे. ट्वीट एडिट करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती. टेस्लाचे CEO यांनी देखील ट्वीट करत ही मागणी केली होती. अखेर ट्विटरने हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्ल्यू टिक असलेल्या सदस्यांसाठी दरमहा ४.९९ डाॅलरमध्ये हे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे. ट्वीट केल्यानंतर यूजर्सला अर्ध्या तासापर्यंत ट्वीट एडिट करता येणार आहे. सध्या ट्विटरने याची टेस्टिंग सुरू केली आहे. ट्विटरने ट्वीट करत सांगितले आहे की, जर तुम्ही ट्वीट केल्यानंतर तुम्हाला एडिटचा पर्याय दिसत असेल, तर हे टेस्टिंगमुळे हा पर्याय दिसत आहे. सुरूवातीला ही सुविधा फक्त व्हेरिफाईट अकाउंट असणाऱ्या युजर्सला मिळणार आहे.

(हेही वाचा आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ तीन महिला कोण?)

आणखी नवे पर्याय मिळणार 

या नव्या पर्यायामुळे तुम्हाला ट्वीट बदलता येणार आहे, पण यामध्ये एक छोटा ट्विस्ट आहे. तुम्हाला ट्वीट एडिट करायचा पर्याय मिळेल, पण तुम्हाला तुमच्या ट्वीटची संपूर्ण हिस्ट्री पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही केलेल्या पहिल्या ट्विटपासून ते तुम्ही बदलेल्या ट्विटपर्यंत. भारतात ही सुविधा कधीपासून येणार याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण व्हेरिफाईट ट्विटर अकाउंट असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे ट्वीट कोणी पाहिले हे देखील तुम्हाला समजणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.