ट्विटर पुन्हा बंद पडले; नेटकऱ्यांकडून संताप

ट्विटरसाठी मंगळवार हा दिवस अत्यंत रडतखडत जात आहे. कारण ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वारंवार बंद पडत आहे. ट्विटरची सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ट्विटर बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना स्टोरी फीड करताना त्रास झाला. तसेच वापरकर्त्यांना ट्विट सुद्धा करता येत नव्हते. मागील एस तासापासून ट्विटर डाऊन झाले आहे. यामुळे वापरकर्त्यांची नाराज होत #TwitterDown हा ट्रेंड सुरु केला आहे.

ट्विटररचा हा प्रॉब्लेम दुपारी ३.४७ वाजल्यापासून व्हायला सुरुवात झाली आहे. ट्विटरमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या देशांमधून येऊ लागल्या. वापरकर्ते ट्विटर मोबाईल आणि वेबसाईटवर वापरू शकत नव्हते. यूएस, युके, जपान आणि भारतातील वापरकर्त्यांना ट्विटर फीड आणि ट्विट पोस्ट करताना समस्या जाणवल्या. सोशल मीडियावर वापरकर्त्यानी ट्विटर वापरता येत नसल्याची तक्रार केली. तर काही वापरकर्त्यांची याबद्दल मजा करताना दिसले. ट्विटर बंद होण्यामुळे काही जणांच्या व्यवसायावर आणि कामावर देखील परिणाम झाला. ट्विटर बंद झाल्यावर युजर्सनी सोशल मीडियावर मीम्सही शेअर केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here