मागच्या वर्षी मस्क यांनी ४४ अब्ज रूपये मोजून ट्विटर विकत घेतले होते. तेव्हापासून ते १२ मे २०२३ पर्यंत मस्क हेच ट्विटरचे मालक आणि सीईओ होते. मात्र त्यांनी मागच्या आठवड्यात एक धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ते या सु्प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिल्यावर दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरू झाली. ‘मस्क राजीनामा देऊन काय करणार’ आणि ‘ट्विटरच्या नवीन सीईओ कोण असतील’ या दोन प्रश्नांची उत्तरे तेव्हापासून शोधायला लागले.
मस्क यांनी ट्विट करत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. घोषणा केल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत नवीन सीईओचे नाव मस्क यांनी घोषीत केले. ज्या नावाची चर्चा जगभरातील युजर्स करत होते, त्याच नावावर सीईओ पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
(हेही वाचा The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होईल या भीतीने ‘द केरळ स्टोरी’ला विरोध)
मस्क उवाच
मस्क यांनी १२ मे रोजी रात्री ९ वाजता एक ट्विट केले. त्यामध्ये ते म्हणाले, मी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याक्करिनोचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्याने व्यावसायिक संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन. आताच्या प्लॅटफॉर्मचं रुपांतर ‘X’ (X/Twitter) मध्ये करण्यासाठी मी लिंडाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.
लिंडा यांचे प्रेरणास्थान
१४ मे रोजी लिंडा यांनी एक ट्विट केले होते. दहा दशलक्षाहून अधिक युजर्सनी त्यांचे हे ट्विट वाचले आहे. त्या म्हणाला की, उज्ज्वल भविष्यासाठी मस्क यांच्याकडे असलेल्या विचारांनी मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या धाडसी व्हिजनला अनुसरुन ट्विटरमध्ये नवे योग्य बदल करण्यासाठी आणि हा व्यवसाय एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.
Thank you @elonmusk!
I’ve long been inspired by your vision to create a brighter future. I’m excited to help bring this vision to Twitter and transform this business together! https://t.co/BcvySu7K76— Linda Yaccarino (@lindayacc) May 13, 2023
मस्क यांच्या ट्विटनुसार पुढील सहा महिन्यांच्या आत लिंडा सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारतील. मस्क यांच्या घोषणेपासून लिंडा यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. या फॉलोअर्सला उद्देशून लिंडा म्हणाल्या की ट्विटर २.० तयार करण्यामध्ये वापरकर्त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
Join Our WhatsApp Community