Twitter Subscription Hike : भारतात ट्विटर वापराचं शुल्क ३५ टक्क्यांनी वाढलं

Twitter Subscription Hike : ट्विटरचं वार्षिक शुल्क तब्बल १८,३०० रुपयांवर गेलं आहे. 

48
Twitter Subscription Hike : भारतात ट्विटर वापराचं शुल्क ३५ टक्क्यांनी वाढलं
  • ऋजुता लुकतुके

एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरचं शुल्क आता ३५ टक्क्यांनी वाढलं आहे. भारतात नवीन दर २१ डिसेंबरपासून लागू झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे आणि सध्याच्या ट्विटर सदस्यांसाठी हे नवीन दर पुढच्या खेपेपासून लागू होतील. ट्विटरने सदस्यता शुल्क वाढवताना तळातील एक्स टिअर आणि एक्स प्रमिअम या दोन सेवांचं शुल्क तसंच ठेवलं आहे. ते अजूनही वार्षिक अनुक्रमे रुपये २४३ आणि रुपये ६५० इतकंच आहे. (Twitter Subscription Hike)

पण, याखेरीज ट्विटरच्या प्रिमिअम आणि प्रिमिअम प्लस ग्राहकांसाठीचं शुल्क ३५ टक्क्यांनी वाढलं आहे. एक्स प्रिमिअम सेवेसाठी आता ग्राहकांना महिन्याला १,७५० रुपये मोजावे लागतील. हेच शुल्क आधी १,३५० रुपये इतकं होतं. तर वार्षिक शुल्क १३,६०० रुपयांवरून वाढून आता १८,३०० रुपये इतकं झालं आहे. तर एक्स प्रिमिअम प्लस सेवेचं शुल्कही महिन्याला १६ अमेरिकन डॉलरवरून २२ अमेरिकन डॉलरवर गेलं आहे. तर वार्षिक शुल्क १६८ अमेरिकन डॉलरवरून २२९ डॉलरवर गेलं आहे. (Twitter Subscription Hike)

(हेही वाचा – Boxing Day Test : विराट, अनुष्का दिसले मेलबर्नच्या रस्त्यावर शॉपिंग करताना)

एक्स कंपनीने या दरवाढीसाठी तीन कारणं दिली आहेत. जाहिरातींच्या अडथळ्याशिवाय मजकूर वाचायचा असेल तर शुल्क वाढ गरजेची असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. म्हणजेच प्रिमिअम आणि प्रिमिअम प्लस श्रेणींवर आता जाहिरातींचा अडथळा असणार नाही. तसंच ट्विटरवर अभिनव मजकूर तयार करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला देता यावा हा आणखी एक विचार त्यामागे आहे आणि ट्विटरवरील नवीन फिचर्ससाठी दरवाढ आवश्यक असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. (Twitter Subscription Hike)

युट्यूब आणि फेसबुकप्रमाणेच ट्विटरवरही क्रिएटर क्लब तयार करण्याचा एक्स कंपनीचा विचार आहे. ट्विटर सुरू झालं तेव्हा कंपनीचा सगळ्यात मोठा महसूल हा जाहिरातदारांकडून येत होता. पण, मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतला आणि त्याचं नाव बदलून एक्स केलं, तेव्हापासून अनेक जाहिरातदारांनी या सोशल मीडियातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक समस्यांशी झुंजणाऱ्या या कंपनीने मस्क यांच्या नेतृत्वात अनेक बदल केले आहेत. जाहिरातदारांपासून दूर जाऊन स्वत:चं बिझिनेस मॉडेल बनवण्याचा कंपनीचा विचार आहे. (Twitter Subscription Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.