#TwitterDown : आता ट्विटर झाले डाऊन, नेटकऱ्यांनी ट्विटरला केले ट्रोल

133

मागील महिन्यात व्हाट्सअप, नंतर फेसबुक डाऊन झाले होते, त्यावेळी नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्रॅफिक जॅम करून झुकरबर्गवर टीकेची झोड उगारली होती, परंतु रविवारी, ११ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजल्यापासून ट्विटर डाऊन झाल्यामुळे नेटकऱ्यानी एलन मस्कला ट्विटरवरच ट्रॉल केले आणि काही मिनिटात ट्विटर डाऊन हा ट्रेंड पहिल्या क्रमांकावर आला.

गुगलचे जीमेलही झालेले बंद

सध्या सोशल मीडियाचे मोठं मोठे व्यासपीठ अशा प्रकारे मध्येच बंद पडू लागले आहेत. कालच गुगलचे जीमेल ही मेलिंग यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांचे नुकसान झाले होते. मध्यंतरी फेसबुक बंद पडले होते, त्यानंतर मोठ्या संख्येने वापरकर्त्यांचे फॉलोवर्सची संख्या कमी झाली होती. आता नावाजलेल्या म्हशीला टोणगा अशी म्हण तंतोतंत लागू पडेल अशी अवस्था ट्विटरची झाली. कधीच बंद न पडणारी ख्याती असलेले ट्विटरच बंद पडल्यामुळे नेटकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा?, अशी विचारण नेटकरी करू लागले.

(हेही वाचा ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.