Twitter : आजही बरेच लोक ट्विटरला ब्लू बर्ड (Twitter Blue Bird) या नावाने ओळखतात. पण जेव्हापासून एलन मस्कने (Elon Musk) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेतले तेव्हापासून त्यांनी त्यात अनेक मोठे बदल केले आहेत. मस्कने ट्विटरचे नाव आणि लोगो दोन्ही बदलले. तसेच त्याचे नाव बदलून X करण्यात आले. आता सॅन फ्रान्सिस्को येथील अमेरिकेच्या मुख्यालयातील निळ्या पक्ष्यासह प्रतिष्ठित ‘ब्लू बर्ड’ लोगोचेही विक्री (Twitter Blue Bird logo sale) झाली आहे. (Twitter)
(हेही वाचा – Malegaon जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक याला अटक)
ट्विटरचा ‘ब्लू बर्ड’ लाेगाेची ३० लाख रुपयांना विक्री
इतिहास जमा झालेल्या या ट्विटरच्या ‘ब्लू बर्ड’चा लिलाव ३४ हजार ३७५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपयांना झाला. लिलाव कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुमारे २५४ किलो वजनाचा आणि १२ फूट लांब आणि ९ फूट रुंद असलेल्या या निळ्या पक्ष्याच्या लोगोच्या खरेदीदाराची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही. यापूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरच्या जुन्या मुख्यालयातील इतर अनेक गोष्टींचा लिलाव केला होता. ज्यामध्ये साइन बोर्ड, स्मृतिचिन्हे, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि अगदी ऑफिस फर्निचरचाही समावेश होता.
(हेही वाचा – IPL 2025 : जाणून घेऊया आयपीएलमधील सर्वकालीन विक्रम, सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी यांचा लेखाजोखा)
Twitter लोगोसह ‘या’ वस्तूंची देखील विक्री
ज्या बोली प्रक्रियेत ब्लू बर्डचा लिलाव करण्यात आला, त्यात Apple-1 संगणक सुमारे ३.२२ कोटी रुपयांना (३.७५ लाख डॉलर्स) विकला गेला. स्टील जॉब्सने (Steel Jobs) स्वाक्षरी केलेला Apple चेक सुमारे ९६.३ लाख रुपयांना (१,१२,०५४ डॉलर्स) विकला गेला. पहिल्या पिढीतील ४ जीबी आयफोन, जो सीलबंद पॅक होता, तो ८७ हजार ५१४ डॉलर्सना विकला गेला. ब्लू बर्डचा (Blue Bird) हा लोगो आता मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट एक्सचा भाग नसला तरी, सोशल मीडियावर त्याची ओळख अॅपल, नायके सारख्या ब्रँड सारखी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community