ट्विटरचे ब्ल्यू-टिक पाहिजे, तर 11 डॉलर्स मोजा

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरील ब्ल्यू-टिकसाठी आता 11 डॉलर्सची सबस्क्रिप्शन किंमत मोजावी लागणार आहे. भारतीय रुपयात याचे मूल्य सुमारे 900 रुपये होते. मोबाईलधारकांच्या मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.गुगलच्या अँड्रॉईड यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची जी किंमत ठेवण्यात आली आहे तीच किंमत ऍपलच्या आयओएस यूजर्ससाठी आकारण्यात येईल असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्वी ही सेवा विनामूल्य होती

जगभरातील राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. त्यामुळे या लोकांचे नेमक्या अकाउंटची माहिती मिळते आणि त्यांच्या फॉलोअर्ससाठीही हे सोयीस्कर ठरते. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी हाती घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन शुल्क आकारण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली होती. आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

(हेही वाचा मुंबईच्या विकासासाठीचा पैसा बँकेत पडून; पंतप्रधान मोदींचा घणाघात)

वार्षिक शुल्क 84 डॉलर्स इतके

गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचे चित्र होते. इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे, त्यांच्याकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी वार्षिक योजनेची किंमत 84 डॉलर्स इतकी आहे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासह इतर काही देशांमध्ये वेब वापरकर्त्यांसाठी सवलत उपलब्ध असेल असे ट्विटरने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here