टिळक विद्यापीठातून मराठी भाषा विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (MA) प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे. महापालिकेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मराठीतून एम. ए करणाऱ्यांना वगळून मुंबई विद्यापिठात एम. ए करणाऱ्यांना ग्राह्य धरून लाभ दिला होता. पण आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम. ए करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राह्य धरले असून त्यामुळे या विद्यापीठातून मराठीतून एम. ए करणारे जे कर्मचारी वंचित राहिले होते. त्या सुमारे ३५० महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या दोन अतिरीक्त वेतन वाढीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (BMC)
महापालिकेचे कामकाज हे १०० टक्के व्हायला हवे. त्यासाठी मराठीतून एम. ए करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्याची मूळ सूचना तत्कालीन मनसेचे नगरसेवक मंगेश सांगळे यांनी मांडली होती आणि त्यानुसार प्रशासनाचे ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (MA) प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढी यापुढे न देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण मराठीत ‘एम. ए’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडून जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. (BMC)
योजना केली बंद…
ही योजना बंद करण्यासाठी प्रशासनाने परिपत्रक जारी केले होते. त्याला विरोध झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने अभिप्राय देऊन जुलै २०१५ पर्यंत जे पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनाच या योजनेच लाभ दिला जाईल, असे सांगितले होते.त्यावर तत्कालीन शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उपसूचनेदवारे २०१५-१६मध्ये ज्यांनी खातेप्रमुखांच्या परवानगीने एम. ए साठी प्रवेश घेतला आहे, त्यांना याचा लाभ दिला जावा, अशी मागणी केली होती. मंगेश सातमकर यांनी उपसूचनेदवारे २०१५-१६मध्ये ज्यांनी खातेप्रमुखांच्या परवानगीने एम. ए साठी प्रवेश घेतला आहे, त्यांना याचा लाभ दिला जावा, अशी मागणी केली. (BMC)
मुंबई विद्यापीठातून करणाऱ्यांनाच लाभ
प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्यांमध्ये अभियंता, वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक वर्गातील अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व त्यांच्या अधिकारी, त्यांचे अधिकारी वर्ग, चतुर्थ श्रेणीतील कामगार कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु सुरुवातीला मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. ए करण्याची अट होती, परंतु नव्या परिपत्रकामध्ये फक्त मुंबई विद्यापीठातून मराठी विषयामध्ये एम. ए करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल, असे म्हटले होते. त्यामुळे यशवंत मुक्त विद्यापीठ, टिळक विद्यापीठ आदींमधून एम. ए करणाऱ्यांना वगळण्यात आले होते. (BMC)
परिपत्रक जारी..
पण आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून करणाऱ्यांना याचा लाभ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मराठीतून एम. ए करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढीचा देण्याच्या गोठवलेला निर्णयाचा प्रशासनाने फेरविचार करत नव्याने निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून याची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या दालनात १८ ऑक्टोबर २०२३ रोजी एक बैठक पार पडली होती, ज्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘मराठी’ विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार दोन अतिरिक्त वेतनवाढी देण्याकरीता सहमती दर्शविण्यात आली. (BMC)
(हेही वाचा – Pakistan-Iran Conflict: पाकिस्तानचा इराणच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार)
वसूल केलेल्या वेतनवाढीचे अधिदान पूर्वलक्षी प्रभावाने…
त्यानुसार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या अभिमत विद्यापीठातून मराठी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (मराठीसह एम.ए.) प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढी यापूर्वी दिल्या असल्यास त्या पूर्वलक्षी प्रभावाने वसूल करण्याबाबतचे परिपत्रके बाद करून वसूल केलेल्या वेतनवाढीचे अधिदान पूर्वलक्षी प्रभावाने परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. (BMC)
सर्व खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त यांना सूचना
तसेच टिळक महाराष्ट्र या विद्यापीठातून मराठी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (मराठीसह एम. ए.) प्राप्त केलेल्या कर्मचा-यास परिपत्रकात दिलेल्या निदेशानुसार दोन अतिरिक्त वेतनवाढी देण्यात आल्या असल्यास त्या वेतनवाढी सुरु ठेऊन, ज्या कर्मचा-यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मराठी विषयामध्ये पदव्यूत्तर पदवी (मराठीसह एम. ए.) प्राप्त करूनही त्यांना दोन वेतनवाढी आकारण्यात आल्या नसल्यास त्यांना परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार दोन अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा. याची आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अखत्यारीतील संबंधित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, असे या परिपत्रकात म्हटले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community