कर्नाटकची (Karnataka) राजधानी बेंगळुरूमधील (Bengaluru) केआरपुरम (KR Puram) येथे दि. २ एप्रिलच्या रात्री आसिफ आणि सय्यद मुशर यांनी एका महिलेवर बलात्कार केला. ही महिला केरळमध्ये काम करते आणि बिहारला जाण्यासाठी तिच्या भावासोबत रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. रात्री दीड वाजता ती महादेवपुरमजवळील (Mahadevapuram) एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. त्याचवेळी तिथे दोन ऑटोरिक्षा चालकांनी हे कृत्य केले. (Bengaluru)
Karnataka | “On April 2 at 1.30 pm, a woman and her brother were travelling to a hotel for lunch, on the outskirts of Mahadevpur police station limits of outer ring road, Bengaluru, when two auto rickshaw drivers (accused identified as Ashif and Syed Mushar in the FIR by Police)…
— ANI (@ANI) April 3, 2025
( हेही वाचा : CISF च्या वाहनाने रिक्षाला दिली धडक; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी)
दरम्यान आसिफ (Asif) आणि सय्यद मुशार (Syed Mushaar) यांनी पीडितेच्या भावाला पकडून मारहाण केली. तर आसिफने महिलेला एका निर्जन ठिकाणी ओढत नेले आणि तिच्यावर लैगिक अत्याचार केला. महिलेचा ओरड ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी एका आरोपीला पकडले. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bengaluru)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community