कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (Thane) परिवहन उपक्रमातील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सिंधीगेट येथील कार्यशाळेला शनिवारी भल्या पहाटे भीषण आग लागली. या आगीत कार्यशाळेत दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दोन बस जळून खाक झाल्या. कार्यशाळेच्या इमारतीचे आगीत नुकसान झाले.
या घटनेबाबत माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. या कार्यशाळेच्या बाजूला बसमध्ये डिझेल भरण्याच्या भूमिगत टँक आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यशाळेच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला तसेच आग परिसरात पसरू नये यासाठी काळजीही घेण्यात आली. कार्यशाळेत दुरुस्तीच्या कामासाठी इंधनचा वापर सुरू असतो. या इंधनाने अचानक पेट घेतला. त्यानंतर ही आग वाढतच गेली.
(हेही वाचा – Shraddha Walkar Case : आफताब केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप नाहीच; मागतोय नवीन कपडे)
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून लावला जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community