मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील (Kuno National Park) २ बछड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आफ्रिकेतून आणलेल्या एका चित्ता मादीने (Cheetah Kuno) दोन पिलाना जन्म दिला होता. त्यांचे मृतदेह बुधवार, २७ नोव्हेंबर या दिवशी आढळून आले. दोन्ही बछड्यांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निर्वा मादीने या दोन पिल्लांना जन्म दिला होता. इतर चित्ते आणि १२ बछडे व्यवस्थित असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्त्याच्या पिल्लांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा करताना गावसकरांनी विराटची तुलना केली नदाल, फेडरर आणि जोकोविचशी…)
आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या निर्वा चिता मादीने दोन बछड्यांना जन्म दिला होता. सिंह परियोजना शिवपुरीचे संचालकांकडून या घटनेची माहिती देण्यात आली. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साधारणतः ११ वाजता रेडिओ टेलिमेट्री आधारे माहिती मिळाली की, निर्वा चिता मादी तिच्या नेहमीच्या क्षेत्रापासून दूर आहे.
त्यानंतर वन्यप्राणी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्राची पाहणी करण्यात आली. चिता मादीचा वावर असलेल्या क्षेत्रात पाहणी केली. तिथे चित्त्याची दोन पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. दोन्ही बछड्यांचे (Cheetah Kuno) मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. परिसरातील इतर ठिकाणी पाहणी केली असता चित्त्याचे बछडे असल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत.
हेही पहा –