विदर्भातही आढळले गोवरचे रुग्ण

103

गोवरमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गोवरचे रुग्ण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यांत आढळल्याची माहिती बुधवारी राज्य आरोग्य विभागाने दिली. राज्यात दहा जिल्ह्यांत ८२ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. तर ७२४ रुग्णांना गोवरची लागण झाली आहे.

बुलढाण्यात हकीम कॉलनी आरोग्य केंद्रातील भागांत गोवरचे दोन रुग्ण सापडले आहेत. तर २४ संशयित रुग्ण आहेत. राज्यात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले असून, आतापर्यंत ३०८ रुग्णांना गोवरची बाधा झाली आहे. मुंबईतील संशयित गोवरबाधित रुग्णांची संख्याही आता ४ हजार १८० वर पोहोचली आहे. मुंबईखालोखाल, मालेगाव, भिवंडी, ठाणे शहरांतही गोवरचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

जिल्हा, मनपाचे नाव — उद्रेक झालेल्या ठिकाणांची संख्या — संशयित रुग्णांची संख्या — बाधित रुग्णांची संख्या — बाधित विभाग

  • मुंबई — ३४ — ४ हजार १८० — ३०८ — ११ — गोवंडी, कुर्ला, एच-ई सह एकूण ८ विभाग
  • मालेगाव मनपा — १२ — ८०८ — ७० — ० — गोल्डन नगर, गयास नगर, आयएमए आरोग्य केंद्र, रमजानपुरा, गुरुवार, रविवार विभाग, निमा आरोग्य केंद्र, संगमेश्वर
  • भिवंडी मनपा — १० — ८३८ — ४८ — ३ — अंजुरफाटा, गायत्रीनगर, भंडारी संकुल, आझमीनगर, नदी नाका, गैबी नगर, शांतीनगर, मिल्लतनगर, अवचितपाडा, कामतघर गाव
  • ठाणे मनपा — ६ — ५२७ — ४४ — ० — अतकोनेश्वर, शील आणि कौसा आरोग्य केंद्र, एमएमव्ही आरोग्य केंद्र, मुंब्रा
  • ठाणे जिल्हा — २ — १३२ — १५ –० — भिवंडी
  • वसई-विरार मनपा — ८ — १८० — ११ — १ — अचोले हेल्थ सेंटर, आंबेडकर आणि पेलकर शहरी आरोग्य केंद्र, धावीण, बिलालपाडा, आंबेडकर नगर, वळीव, पाटणकर पार्क
  • पनवेल मनपा — १ — १४८ — ५ — ० — खारघर शहरी प्रा.आ.केंद्र
  • नवी मुंबई मनपा — ४ — २३४ — १२ — ० — पवने आरोग्य केंद्र, जुहू गाव, करवे गाव, सीबीडी
  • औरंगाबाद मनपा — २ — ११६ — १२ — ० — नेहरुनगर, चिखलठाणा
  • पिंपरी-चिंचवड मनपा — १ –२५६ — ८ — ० — कुडळवाडी
  • बुलडाणा — १ — २४ — २ — ० — हकीम संकुल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.