कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी – वेर्णा स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर बदल केला आहे. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Konkan Railway)
कोकण रेल्वेच्या करमळी – वेर्णा विभागात ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२२१८ चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस (Chandigarh – Thiruvananthapuram Central Express) करमळी स्थानकाच्याआधी ४५ मिनिटे थांबवण्यात येईल. (Konkan Railway)
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (Nagpur-Madgaon Express) करमळी स्थानकाच्या आधी ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावतील. (Konkan Railway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community