Meagablock : मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

161
Meagablock : मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
Meagablock : मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेणार आहे. तर रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रविवारी लोकल प्रवास करणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. लोकल अवेळी धावतील आणि इच्छित स्थानकात उशिराने पोहचतील. (Meagablock)

मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ असा चार तासांचा ब्लॉक
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथे येणार्‍या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील फलाट क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर फलाट क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येईल.
हार्बर मार्ग
कधी : कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कुठे : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल / बेलापूर आणि बेलापूर – सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल.

(हेही वाचा : Mahad Fire : घटनास्थळी NDRF चे पथक दाखल ;अद्याप ७ जणांचा शोध सुरूच)

विद्याविहार येथे उड्डाणपुलाचे काम
विद्याविहार स्थानकातील उड्डाणपुलाचे काम शनिवारी रात्री करणार आहे. यासाठी कुर्ला आणि भांडुपदरम्यान सर्व सहा मार्गावर शनिवारी रात्री १. १० ते पहाटे ४. २० पर्यंत ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात लोकल सेवेसह लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे. सीएसएमटी येथून शनिवारी रात्री ११. ४७ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटी येथून रविवारी पहाटे ५. १६ वाजता सुटणारी अंबरनाथ लोकल ठाणे येथून सुटेल. आठ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.