औरंगाबादेत कार-दुचाकीत जोरदार धडक; दोघे जागीच ठार

two death in car and bike accident in Aurangabad
औरंगाबादेत कार-दुचाकीत जोरदार धडक; दोघे जागीच ठार

पैठण शहरापासून पासून जवळ असलेल्या पाचोड फाट्या नजीक भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

पैठणहून पाचोडकडे भरधाव वेगात जाणारी मारुती वेगण कार क्रमांक एम एच २० बिएन ९११४च्या चालकाने पाचोडहून पैठणकडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच २० एफ टी २९८५ला जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद येथील राजनगर मुकुंदवाडीत राहणारा प्रकाश काळुजी गवळी (वय ५५) आणि झारखंड येथील कामगार स्मसुदिन अन्सारी (वय ३०) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे.

कार चालक आणि प्रवासी फरार

या अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हाळ, जमादार गोपाळ पाटील,महेश माळी , भगवान धांडे ,मुकुंद नाईक आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान कार चालक आणि कारमधील प्रवासी अपघात घडताच फरार झाले. पैठण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पैठण पोलीस करीत आहे.

(हेही वाचा – दिल्लीसह उत्तरेत भूकंपाचे धक्के; नेपाळमध्येही ४.४ रिश्टर स्केलचे हादरे)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here