अमरनाथ येथील ढगफुटीत पुण्यातील दोन जणांचा मृत्यू

107

जम्मू-काश्मीर येथील पवित्र अशा अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी मोठी ढगफुटी झाली असून त्यात 15 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये पुण्यातील एका महिलाचा देखील समावेश असून, या घटनेच्या धक्क्यामुळे पुण्यातील आणखी एका नागरिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यातील दोघांचा मृत्यू

आळंदीतील माऊली ट्रॅव्हल्स कंपनीकडून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या वडगाव येथील सुनिता भोसले यांचा ढगफुटीमुळे झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. भोसले यांच्यासोबत त्यांचे पती आणि नणंद आहेत. त्यांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आणण्यात आले आहे. तसेच पिंपरी येथील रहिवासी प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकॅम्पवर आल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली आहे.

शुक्रवारी ढगफुटी

30 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. अमरनाथ यात्रेला हजारो भाविक जात असतात. अमरनाथ पवित्र गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी होऊन 15 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सीच्या माध्यमातून बचावकार्य राबवण्यात आले असून यामधून काही भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.