पालघरमध्ये शनिवारी, २७ मे रोजी सलग दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ आणि ३.३ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पण या अचानक झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे लोक घराबाहेर पडले आहेत.
(हेही वाचा – Monsoon : सरासरीपेक्षा जूनमध्ये कमी पाऊस; हवामान खात्याने वर्तवला अंदाज)
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र माहितीनुसार, पालघरमध्ये ३.५ आणि ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के क्रमशः शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता आणि ५.२८ वाजता जाणवले.
Two earthquakes tremors with magnitudes of 3.5 and 3.3 on the Richter Scale hit Palghar in Maharashtra at 5:15 pm and 5:28 pm respectively: National Centre for Seismology pic.twitter.com/sD4aafbZtO
— ANI (@ANI) May 27, 2023
स्थानिकांच्या माहितीनुसार, जसे भूकंपाचे धक्के जाणवले त्याच क्षणी लोकं घाबरून घराच्या बाहेर पडले. पहिल्या भूकंपाच्या वेळी जमीन जवळपास १० सेकंद हादरली. त्यानंतर दुसऱ्या भूकंपाच्या वेळी जमीन १० ते १५ सेकंद जमीन हादरत होती. दरम्यान भूकंपामुळे कोणाच्या घराचे नुकसान झाले नाही. शिवाय कोणीही अद्याप जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community