मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी, १० (ऑक्टोबर) गँट्री बसविली जाणार असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तास बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) कळविण्यात आले आहे. (Mumbai – Pune Exressway)
(हेही वाचा : Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार यांची नियुक्ती घटनेच्या विरोधात)
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत लोणावळा एक्झिट येथे गँट्री बसविण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे. या कामासाठी दुपारी दोन तास पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांना खंडाळा एक्झिटमार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण येथील पथकर नाक्यावरून पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून जाता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. प्रवाशांची यामध्ये थोडी गैरसोय होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community