तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (IAF )
भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (४ डिसेंबर) तेलंगणा मध्ये सोमवारी सकाळी 8:55 वाजता हवाई दलाचे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात दोन पायलट होते. (IAF )
(हेही वाचा : Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा बिग बीं च्या आवाजातील व्हिडिओ शेअर)
ज्यामध्ये एक ट्रेनर होता जो नवीन कॅडेटला विमान उडवायला शिकवत होता. विमानाने दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीतुन उड्डाण घेतले आणि सकाळी अपघात झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार विमान काही मिनिटात जाळून खाक झाले. गेल्या आठ महिन्यातील हवाई दलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षण घेताना विमान अपघात झाला. मे महिन्यात मिग-२१ विमान कोसळून तीन वैमानिकांचा मृत्यू झाला होता . (IAF )
हेही पहा –