नागपुरातील दोन लहान मुलांना HMPV ची लागण; महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव

112
नागपुरातील दोन लहान मुलांचा HMPV ची लागण; महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव
नागपुरातील दोन लहान मुलांचा HMPV ची लागण; महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव

कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळत आहे. सोमवार, ७ जानेवारी या दिवशी बंगळुरू (Bangalore) आणि गुजरातमध्ये (Gujarat) या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही (Nagpur) एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – मुलांना Social Media वर अकाऊंट ओपन करायचे आहे ? पालकांना विचारा !)

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणे दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. HMPV ची लक्षणे प्रामुख्याने लहान मुलांमध्येच दिसून येत असल्याने विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ञ करत आहेत.

काय करावं?
  • खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
  • साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
  • खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
  • टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
  • आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

असे आवाहन तज्ञ करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.