Punjab मधून २ खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक; आयईडी बॉम्बसह आरडीएक्स जप्त

45
Punjab मधून २ खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक; आयईडी बॉम्बसह आरडीएक्स जप्त
Punjab मधून २ खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक; आयईडी बॉम्बसह आरडीएक्स जप्त

पंजाबमधील (Punjab) फिरोजपूरमध्ये (Firozpur) पोलिसांनी एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दहशतवादी कटात सहभागी असलेल्या जग्गा सिंह (Jagga Singh) आणि मनजिंदर सिंह (Manjinder Singh) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव (Gaurav Yadav) म्हणाले की, हे दोघेही जर्मनीमध्ये (Germany) राहणाऱ्या गुरप्रीत सिंह उर्फ ​​गोल्डी ढिल्लनसाठी काम करत होते. गोल्डी ढिल्लन हा गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा निकटवर्तीय मानला जातो.

( हेही वाचा : दहिसरमध्ये UBT Shiv Sena ला मोठा धक्का, उपनेत्या तसेच माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश)

पोलिसांनी त्यांच्याकडून २.८ किलोचा आयईडी बॉम्ब जप्त केला. ज्यामध्ये १.६ किलो आरडीएक्स होते. त्यासोबत एक रिमोट कंट्रोल देखील देण्यात आला होता. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, हा बॉम्ब एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी आणण्यात आला होता. (Punjab)

डीजीपी गौरव यादव (Gaurav Yadav) म्हणाले की, हा कट पाकिस्तानच्या आयएसआयने रचला होता, जो उधळून लावण्यात आला. एनआयएने गोल्डी ढिल्लनवर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. या प्रकरणी स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Punjab)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.