मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे असलेल्या चार मजली इमारतीला शनिवारी (2 डिसेंबर) रात्री ९.३० वाजता लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. BMC (बृहन्मुंबई महानगरपालिका) ने एका निवेदनात दोन लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांची सुखरूप सुटका केल्याचे बीएमसीने म्हटले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. (Mumbai Fire)
मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरातील गोमती भवन इमारतीला लेव्हल-2 आग लागल्याचे बीएमसीने सांगितले. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यापर्यंत ही आग लागली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रांगणेकर रोडवरील गोमती भवनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रात्री 9.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. (Mumbai Fire)
(हेही वाचा : Assembly Election 2023 : छत्तीसगढमध्ये भाजप आघाडीवर)
यानंतर अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण लगेच कळू शकले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीतून दोन जणांचे जळालेले मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community