झारखंडच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने पाच माओवाद्यांना कंठस्नान घातले. छतरा जिल्ह्यात माओवाद्याच्या दला विरोधात ही कारवाई झाली आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या माओवाद्यांपैकी दोघांवर प्रत्येकी 25 लाख रुपये बक्षीस आहे.
सुरक्षा दलांनी पलामू छतरा सीमेवर लावालोंग ठाण्याच्या हद्दीत माओवादींविरोधात मोहीम उघडली होती. या मोहिमेत सीआरपीएफ १९० बटालियन, कोब्रा बटालियन, जॅप, आयआरबीसह पलामू आणि छतरा जिल्हा दलाचाही मसावेश होता. नक्षलविरोधी मोहिमेत लावालोंग ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा दलांनी पाच माओवाद्यांना ठार केले. चकमकीत ठार झालेला माओवादी गौतम पासवान हा स्पेशल एरिया कमिटीचा सदस्य होता. तर या कारवाईत सहापेक्षा अधिक माओाद्यांना गोळ्या लागल्याचेही सांगण्यात येत आहे. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीही हिकेरच्या जंगलात माओवाद्याला ठार करण्यात आले होते. त्याची ओळख पटली असून मृतक माओवादी हा कंपनी दहाचा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे नाव समीर उर्फ साधू लिंग मोहदा असे असून तो भामरागड तालुक्यातील तूमरकोडी येथील रहिवासी आहे. चकमक आणि इतर असे चार गुन्हे दाखल आहेत. 2018 साली पोलिसांना जीवे मारण्यासाठी अॅबुश लावणे यासाठी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. 2014-15 मध्ये चातगाव दलामध्ये भरती होऊन तो 2017 साली प्लाटुन क्रमांक सातमध्येही कार्यरत होता. भास्कर या जहाल माओवादी नेत्याचा तो सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होता. 2018 साली कंपनी चारमध्ये त्याला पाठवण्यात आले. त्यानंतर कंपनी क्रमांक दहामध्ये तो सध्या सक्रिय होता. त्याच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस आहे.
(हेही वाचा लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; संजय शिरसाटांचा मोठा दावा)
Join Our WhatsApp Community