आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) या गटातून मराठा समाजातील मुलांनी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. दरम्यान, राज्य शासनाने मराठा समाजातील मुलांना ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र देणे बंद केले. त्याऐवजी सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग अर्थात ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. (EWS Certificate)
(हेही वाचा – डिजिटल भारत योजनेंतर्गत गावकऱ्याला मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; महसूलमंत्री Chandrasekhar Bawankule)
आता प्रवेश देणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांकडून ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्राची सक्ती केली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच दिले. (EWS Certificate)
(हेही वाचा – BMC Hospital : महापालिका रुग्णालयांमधील संक्रमण रोखण्यासाठी सीएसएसडीची स्थापना)
तहसील कार्यालयांकडून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने देण्यात येत होते. त्यामध्ये एक प्रमाणपत्र हे राज्य सरकारने दिलेल्या नमुन्यानुसार, तर दुसरे प्रमाणपत्र हे केंद्र सरकारच्या नमुन्यामध्ये देण्यात येत होते. दोन्ही प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठी कागदपत्रे एकसारखीच द्यावी लागतात. विद्यार्थी हे प्रमाणपत्र केंद्र किंवा राज्याच्या गरजेप्रमाणे शैक्षणिक किंवा नोकरीच्या कामासाठी वापरत होते. (EWS Certificate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community