पोलिस चकमकीत दोन नक्षली ठार!

रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करून घातपात घडविण्याचा नक्षलवाद्यांचा मनसुबा होता.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यात दोन नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गट्टा- जांबिया पोलिस मदत केंद्राजवळ २२ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार केला होता.

घातपात घडविण्याच्या नक्षलवाद्यांचा होता मनसुबा!

गट्टा-जांबिया जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून बुधवारी, २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबवत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. त्यावेळी सतर्क होऊन पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास जशाच तसे प्रत्युत्तर दिले. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करून घातपात घडविण्याच्या नक्षल्यांचा मोठा मनसुबा होता. त्यासाठी नक्षल्यांनी गोळीबार करून एक हॅन्डग्रेनेडही फेकला होता. त्यामुळे पोलिस विभागही सतर्क होऊन नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले असून याच भागातील जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. प्राप्त माहितीच्या आधारावर शोधमोहीम राबवत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. सी-६० पोलिसांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here