‘हमारे बॅगमे हथियार है, तुम्हारी तिजोरी मे जितना पैसा पडा है, चुपचाप हमारे हवाले कर दो’, अशी धमकी देत अंगाडीयाला लुटल्याची घटना काळबादेवी येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. काळबादेवी येथील स्वदेश बाजार येथील इमारतीत घडलेल्या घटनेत १५ लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लुटारूचा कसून शोध घेण्यात येत आहे.
१५ लाख रुपयांची रक्कम चोरून पळ काढला!
काळबादेवी येथील स्वदेशी बाजार या नेहमी गजबजलेल्या परिसरात सध्या लॉकडाऊनमुळे वर्दळ कमी आहे. याचा चोरांनी फायदा घेतला. कार्यालयात असणाऱ्या दोन नोकरांना या लुटारूंनी ‘हमारे बॅगमे हथियार है, तुम्हारी तिजोरी मे जितना पैसा पडा है वो चुपचाप हमारे हवाले कर दो। नही तो तुम दोनो को जान से मार देंगे’,असे धमकावून दोन्ही नोकरांना एका ठिकाणी बसण्यास सांगून तिजोरीमध्ये असणारी १५ लाख रुपयांची रक्कम चोरी करून दोघांनी तेथून पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या नोकरांनी मॅनेजरला फोन करून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. मॅनेजर रणजीत शहा याने घटनास्थळी येऊन पोलिसांना कळवले. लोकमान्य टिळक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून लुटारूचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
(हेही वाचा : पोलिस दलातील असाही एक ‘वाझे’ ! पोलिस उपाधीक्षकाने मागितली २ कोटींची लाच!)
Join Our WhatsApp Community