राज्यात कोरोनाचा छोटी गावे व शहरांमध्ये प्रसार, सोमवारी अडीच हजार रुग्णांची नोंद

मुंबई व जवळच्या महानगरानंतर कोरोना आता छोट्या शहर आणि गावांमध्ये पसरु लागला आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांत आता कोरोनाची दोन आकडी रुग्णसंख्येवर उपचार सुरु आहेत. राज्यात दर दिवसाला तीन ते चार हजारांपर्यंत कोरोना रुग्णांची आकडेवारी पोहोचलेली असताना सोमवारी तुलनेने नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आढळली. सोमवारी राज्यात २ हजार ३५४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर १ हजार ४८५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.

सोमवारी मुंबईत दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्क्यांवर नोंदवला जात आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के आहे. सोमवारी मुंबईत केवळ १ हजार ३१० कोरोना रुग्णांची भर पडली.

मुंबई व महानगर प्रदेशांमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची 

 • मुंबई – १४ हजार ८९
 • ठाणे – ५ हजार ५२२
 • रायगड – १ हजार ५२

मुंबई व महानगराबाहेरील मुख्य शहरांतील कोरोना रुग्णांची संख्या 

 • पुणे – २ हजार ७
 • नाशिक – १५८
 • औरंगाबाद – ५०
 • नागपूर – ३०९
 • अहमदनगर – ६९
 • सिंधुदुर्ग – ५७
 • रत्नागिरी – ५६

इतर शहरे, गावांतील कोरोना रुग्णांची संख्या 

 • सातारा – ३२
 • लातूर – ४४
 • चंद्रपूर – ४३
 • वाशिम – ३७

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here