मुंबईकरांनी मुंबईत एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत १ लाख ४२ हजार दुचाकींची खरेदी झाली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी १ लाख २६ हजार वाहनांची खरेदी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. (Bike Sale Mumbai)
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईतील चारही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (Sub Regional Transport Offices) दुचाकीच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांच्या नोंदणीतही वाढ झाली असली, तरी ती केवळ १ टक्के एवढीच आहे. मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या दिवसागणिक वाढतच आहे, असे असूनही वाहनांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. एवढ्या वाहनांना पार्किंग उपलब्ध करून देणे हेदेखील प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. (parking in mumbai)
(हेही वाचा – Election : निवडणुकांचे फटाके दिवाळीत फुटणार?; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष)
रोज कार्यालय ते घर, शाळा, महाविद्यालय, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि घरातील छोटी-मोठी कामे करण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. वाहतूककोंडीतून (traffic jam in mumbai) मार्ग काढण्यास दुचाकी वाहने सोपी असतात. त्यामुळे बाइकची खरेदी करण्यावर नागरिक भर देतात. तसेच दुचाकीच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे दुचाकीच्या विक्रीत दिवसागणिक वाढ होत आहे.
सध्या मुंबईत (Mumbai) नोंदणी असलेल्या एकूण ४९ लाख वाहनांपैकी ३० लाख म्हणजेच ६१ टक्के दुचाकी आहेत. ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली या आरटीओंमध्ये (RTO) दिवसाला सरासरी ७२१ वाहने रजिस्टर होतात. त्यापैकी ५०० ते ६०० ही दुचाकी असतात. (Bike Sale Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community