दहिसर येथे २ युवक तलावात बुडाले

मुंबईत सर्वत्र मंगळवारी, ५ जुलै रोजी मुसळधार पाऊस होता, त्यामुळे मुंबईतील तलावांमध्येही पाणी पातळी वाढली होती, असे दहिसर येथील खदान तलावात ७ तरुण पोहण्यासाठी उतरले होते, त्यामध्ये २ युवकांचा बुडून मृत्यू झाला.

मंगळवारी दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खदान तलाव येथे बोरवली पश्चिम येथील सात तरुण (वय वर्षे 25) तलावात पोहण्यासाठी आले होते. त्यांच्या पैकी दोन तरूण तलावात बुडाले, त्यातील एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. बुडालेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या मार्फत सुरु आहे. यातील ५ तरुण सुखरूप आहेत.

(हेही वाचा ११ जुलैनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here