मुंबईत मान्सून पूर्व मृत झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे काम महापालिकेच्या उदयान विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले असले तरी, पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे झाडे पडून मनुष्य आणि वित्त हानी होण्याच्या घटना यंदा पावसाच्या पहिल्याच मोसमात झाल्याचे पहायला मिळत आहे.
बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात दिवसभरात २२ झाडे आणि त्यांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. त्यात शहरात ०३, पूर्व उपनगरांत ०७ आणि पश्चिम उपनगरांत १२ अशाप्रकारे एकूण २२ झाडांच्या दुघर्टनांचा सामावेश आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम येथील मिठा नगर परिसरातील जुन्या महापालिका वसाहतीजवळ एम जी रोडवर झाडाची फांदी तुटून एका चाळीवर पडली. त्यात एक व्यक्ती जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या प्रार्थना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रेमलाल निर्मळ असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ३० वर्षांचे होते.
(हेही वाचा – हनुमान चालीसा पठण करीत हिंदूंनी सोसायटीत होणारी बकऱ्यांची कुर्बानी रोखली)
त्यापूर्वी मालाड पश्चिम मामलेवाडी परिसरात झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कौशल्य महेंद्र जोशी (३३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मणिभाई मुंजी चाळ येथे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. कौशल जोशी या चाळीती शौचालयात गेले असता हे झाडे त्या शौचालयाच्या भागावर पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community