लोकल मध्ये प्रवास करताना होणारी भांडणे ही नित्याचीच झाली आहे. असेच काहीसे भांडण गुरुवारी ( १९ जानेवारी)
चर्चगेट-विरार वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाची आणि पासधारक प्रवाशांमध्ये झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यांची भांडणे इतकी वाढत गेली की, याचे हाणामारीमध्ये रूपांतर होण्यापूर्वी ऑन-ड्युटी तिकीट तपासणीसांनी हस्तक्षेप करून हाणामारी रोखली. या दोन्ही तरुणाच्या गुंडगिरीमुळे त्यांना नालासोपारा आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mumbai Viral Video)
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चर्चगेट -विरार वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट नसलेल्या दोन तरुण प्रवास करत होते. यादरम्यान काही प्रवाशांनी त्यांना एसी लोकल असल्याची माहिती दिली. मात्र तेव्हा या दोन्ही तरुणी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर पासधारक प्रवासी आणि फुकट्या दोन तरुणांची चांगली बाचाबची सुरू झाली.(Mumbai Viral Video)
View this post on Instagram
(हेही वाचा : Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल; वाचा सविस्तर)
प्रवाशांना भांडण्याचा आवाज ऐकल्यानंतर ऑन ड्यूटी तिकीट तपासणीसाचे पथक त्या कोचपर्यंत पोहोचले. या दोघांमध्ये हस्तक्षेप करून हाणामारी रोखली. मात्र त्यानंतर या दोन्ही तरुणाना टीसीना तिकीट विचारल्यानंतर तिकीट नसल्याचे सांगितले. तसेच टीसीबरोबरही गैरवर्तन केले. दोन्ही तिकीट नसलेल्या प्रवाशांना पुढील कारवाईसाठी नालासोपारा आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले हा सर्व प्रकार बघून काही प्रवाशांनी या घटनेचा व्हीडिओ मोबईलमध्ये कैद केला.
हेही पहा –