चांगल्या नोकरीसाठी लोकांची सर्वाधिक पसंती अमेरिका, युनायटेड किंगडम आणि कॅनडा सारख्या देशांना पसंती असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचे अर्ज या देशांकडे येत असतात, यासाठी होणारी अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी किचकट स्वरुपाची असते. मार्च महिन्यात २०२४ च्या आर्थिक वर्षासाठी युस एचवनबी व्हिसा देण्याची मर्यादा संपली असल्याचे अमेरिकेच्या नागरिकत्व सेवा देणाऱ्या म्हणजेच USCIS ने सांगितले आहे. बऱ्याच देशांच्या व्हिसा अर्जासाठी कठोर नियम व अटी असतात त्यातीलच एक म्हणजे ऑफरिंग लेटर असते. तथापि कोविड महामारीमुळे जर्मनी, युएई सारख्या देशात कामगारांची तसेच संबधित क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी भारतीयांना नोकरीच्या संधीसाठी वेगळा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरीसाठी इच्छुकांना देण्यात येणाऱ्या व्हिसामुळे भारतीय लोक परदेशात जाऊन नोकरी शोधू शकतात, तसेच एकदा नोकरी मिळाल्यानंतर ते तिथे स्थायिक होऊ शकतात. जर्मनी, ऑस्टि्या, स्वीडन, युएई आणि पोर्तुगाल या देशांनी भारतीयांना हा नोकरीसाठीचा व्हिसा दिला आहे.
जर्मनी
जर्मनीने सहा महिन्यांपर्यंतचा नोकरीसाठीचा विशेष व्हिसा प्रत्येकाला दिलेला आहे. जर तुम्हाला सहा महिन्यात नोकरी मिळाली तर जर्मन वर्क व्हिसा दिला जाईल.
(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)
पोर्तुगाल
पोर्तुगालने २०२२ मध्येच नोकरीचा विशेष व्हिसा दिला असून १२० दिवस म्हणजेच चार महिन्यापर्यंत व्हिसा मिळालेल्यांना देशात राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच दोन महिन्यांसाठी व्हिसा नुतनीकरण केल्यावर पुन्हा फक्त एकदाच पोर्तुगालमध्ये येऊ शकतो.
युएई
युएईने दोन, तीन आणि चार महिन्यासांठी नोकरीसाठी विशेष व्हिसा दिलेला आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती विना स्पॉनरशीप फक्त एकदाच युएईत येऊन नोकरीसाठी धडपड करु शकते.
ऑस्ट्रिया
ऑस्ट्रियाने नोकरी विशेष व्हिसा सहा महिन्यांसाठी दिला असून, उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला किमान ७० टक्के गुण मिळवून विविध निकषांवर खरं उतरले पाहिजे त्यामध्ये शिक्षण, काम, भाषेवरच प्रभुत्व वय, ऑस्ट्रियामध्ये केलेल्या अभ्यासाचा अनुभव हे काही पात्रतेचे निकष आहेत.
Join Our WhatsApp Community