उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) दि. २७ जानेवारी रोजी समान नागरी संहिता (Uniform Civil Code ) लागू केला जाणार आहे. यूसीसी पोर्टल सोमवारी दुपारी 12:30 वाजता सचिवालयात सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांचे सचिव शैलेश बागोली (Shailesh Bagoli) यांनी सांगितले. या निर्णयामुळे समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनणार आहे.
( हेही वाचा : Republic Day : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्ती कर्नल विजय भावे यांच्या हस्ते ध्वजावतरण)
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले होते की, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand)जानेवारीपासून समान नागरी संहिता (Uniform Civil Code ) लागू केली जाईल. राज्य सरकारने आपला ‘गृहपाठ’ पूर्ण केला आहे आणि जानेवारीपासून संपूर्ण राज्यात समान नागरी संहिता (Uniform Civil Code ) लागू केली जाईल. मात्र नागरी निवडणुकीची मतमोजणी 27 रोजी होत आहे.
समान नागरी संहिता म्हणजे काय?
समान नागरी संहिता (Uniform Civil Code ) म्हणजे देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी (प्रत्येक धर्म, जात, लिंगाचे लोक) समान कायदा असणे. कोणत्याही राज्यात नागरी संहिता लागू झाल्यास विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेचे विभाजन अशा सर्व विषयांमध्ये प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा असेल. राज्यघटनेच्या चौथ्या भागात, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांचे तपशीलवार वर्णन आहे, ज्यामध्ये अनुच्छेद 44 असे नमूद करते की सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करणे ही सरकारची जबाबदारी आहे. (Pushkar Singh Dhami)
UCC लागू करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे
गोव्याला भारतीय राज्यघटनेत विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. तसेच कायदा करून संसदेने गोव्याला पोर्तुगीज नागरी संहिता (Portuguese Civil Code) लागू करण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे गोवा हे एकमेव राज्य आहे, जेथे नागरी भार लागू आहे. हे विधेयक लागू झाल्यानंतर, उत्तराखंड हे पहिले राज्य होईल जेथे स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू केली जाईल. (Uniform Civil Code )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community