संशयास्पद IMPS व्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) युको बँकेवर छापेमारी केली. सीबीआयने महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांतील 67 ठिकाणी छापे टाकले. (UCO Bank CBI Raid) हे संशयास्पद IMPS व्यवहार 800 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे आहेत. सीबीआयने या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची सुनावणी 1 एप्रिलपर्यंत दस्तावेज सादर करा)
130 कागदपत्रांसह 43 डिजिटल उपकरणे जप्त
सीबीआयने बुधवारी राजस्थान आणि महाराष्ट्रात हे छापे टाकले. 820 कोटी रुपयांच्या संशयास्पद IMPS व्यवहारांबाबत छाप्यादरम्यान UCO बँक आणि IDFC शी संबंधित सुमारे 130 कागदपत्रांसह 43 डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये 40 मोबाईल फोन, 2 हार्ड डिस्क आणि 1 इंटरनेट डोंगलसह इतर गोष्टींचा समावेश आहे. युको बँकेच्या (UCO Bank) वेगवेगळ्या खात्यांमधून हे व्यवहार झाले. सीबीआयने घटनास्थळी आणखी 30 संशयितांची चौकशी केली आहे.
सीबीआयने यापूर्वी डिसेंबर 2023 मध्येही अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर कोलकाता आणि मंगळुरुमध्ये खासगी बँकधारक आणि युको बँकेच्या अधिकाऱ्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. याच क्रमाने 6 मार्च 2024 रोजी सीबीआयने राजस्थान आणि महाराष्ट्रातील जोधपूर, जयपूर, जालोर, नागपूर, बारमेर, फलोदी आणि पुणे येथे छापे टाकले. या छाप्यांमध्ये युको बँक आणि आयडीएफसी बँकेशी संबंधित 130 संशयास्पद कागदपत्रे आणि 43 डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
काय आहे प्रकरण
IMPS व्यवहार 10 नोव्हेंबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाले. 7 खाजगी बँकांच्या 14,600 खातेदारांनी UCO बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने IMPS व्यवहार केले. या प्रकरणात मूळ खात्यातून एकही पैसा डेबिट झाला नाही; परंतु युको बँकेच्या 41,000 खात्यांमध्ये एकूण 820 कोटी रुपये जमा झाले. यापैकी बहुतांश खातेदारांनी वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे बँकेतून पैसे काढले. (UCO Bank CBI Raid)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community