जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरुपात आणणार; मंत्री Uday Samant यांचे विधान

41
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरुपात आणणार; मंत्री Uday Samant यांचे विधान
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरुपात आणणार; मंत्री Uday Samant यांचे विधान

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या (Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj) अभंग गाथेतील सर्व अभंग महाराष्ट्र शासन ई बुक, ऑडिओ स्वरूपात आणणार असून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या जागेतील विकास आराखड्यासाठी देखील शासन निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आळंदी येथे दिली.

( हेही वाचा : चवदार तळाच्या सत्याग्रहामुळे देशाची दिशा बदलली; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee) , व ओळख श्री ज्ञानेश्वरीची (Shri Dnyaneshwari) परिवाराकडून विद्यार्थ्याच्या मूल्यसंवर्धनासाठीची ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ओळख ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी सदर उपक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील मूल्य शिक्षणात घेण्याबाबत विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काळात राज्य शासनातर्फे त्रिदिनी कीर्तन महोत्सव देखील आळंदीत राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Uday Samant)

यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप (Adv. Rajendra Umap), डॉ. भावार्थ देखने, माजी विश्वस्त अभय टिळक, डॉ. नारायण महाराज जाधव, नरहरी चौधरी, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंके, शेवाळे महाराज, उमेश महाराज बागडे व इतर मान्यवर उपस्थित होते. (Uday Samant)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.